'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

 बॉलिवूडची ड्रिम गर्ल म्हटलं की आपल्या सर्वांना हेमामालिनी हेच नाव आठवतं. या ड्रिम गर्लच्या चाहत्यांसाठी एक खास खूषखबर आहे. 

Updated: Feb 13, 2016, 08:35 PM IST


गायिका हेमामालिनी

मुंबई : बॉलिवूडची ड्रिम गर्ल म्हटलं की आपल्या सर्वांना हेमामालिनी हेच नाव आठवतं. या ड्रिम गर्लच्या चाहत्यांसाठी एक खास खूषखबर आहे. 

हेमामालिनी घेऊन येत आहे एक गाण्यांचा अल्बम. या अल्बमचं वैशिष्ट्य असं की आपण आजपर्यंत हेमामालिनीची अभिनेत्री, निर्माती, डान्सर, पॉलिटिशियन अशी अनेक रुपं पाहिली. मात्र आता हीच ड्रिम गर्ल चक्क गायिका म्हणून पहिल्यांदाच समोर येणारे आणि तेही ड्रीम गर्ल या नव्या अल्बमच्या निमित्ताने. 

सारेगमने या अल्मबची निर्मिती केलीय.  अल्बमचं लॉन्चिंगही एकदम शानदार पद्धतीने होणार आहे. 

अल्बमच्या लॉन्चिंगला शोले फेम जोडी बिग बी अमिताभ आणि धर्मेंद्र हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. 

व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारीला मुंबईत 'ड्रीम गर्ल'च्या या म्युझिकल अल्बमचं लॉन्चिंग होणार आहे.