गुत्थी, दादी स्टेजवर पुन्हा कधीच दिसणार नाहीत?

'कॉमेडी नाईटस विथ कपिल' हा शो आता 'कॉमेडी नाईटस लाईव्ह' या नावाने दुसरे कलाकार सादर करत आहेत. परंतु, या कार्यक्रमातील कलाकारांना मात्र कलर्स टीव्हीनं नोटीस पाठवल्यात. 

Updated: Feb 13, 2016, 07:57 PM IST
गुत्थी, दादी स्टेजवर पुन्हा कधीच दिसणार नाहीत? title=

नवी दिल्ली : 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' हा शो आता 'कॉमेडी नाईटस लाईव्ह' या नावाने दुसरे कलाकार सादर करत आहेत. परंतु, या कार्यक्रमातील कलाकारांना मात्र कलर्स टीव्हीनं नोटीस पाठवल्यात. 

कपिलच्या कार्यक्रमातील दादी आणि गुत्थीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अली असगर आणि सुनील ग्रोवर या दोन कलाकारांना कलर्स टीव्हीनं ही नोटीस पाठवलीय. 

'डीएनए'नं दिलेल्या माहितीनुसार, सुनील आणि अली १९ फेब्रुवारी रोजी दुबईतल्या एका लाईव्ह कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीसदेखील असतील. या कार्यक्रमाच्या आयोजकांना सुनील आणि अलीला त्यांच्या गुत्थी आणि दादीच्या भूमिकेत पाहायचंय... पण, यालाच कलर्सचा विरोध आहे.

या लाईव्ह कार्यक्रमात अली आणि सुनील दोघांनीही जर गुत्थी किंवा दादीच्या भूमिकेची जराही नक्कल केली तर कॉपीराईट उल्लंघनाची तक्रार दाखल करू, अशी धमकीच या नोटिशीमधून कलर्सनं या दोघांना दिलीय.

यामुळे, चॅनेल आणि कार्यक्रमाच्या वादात प्रेक्षकांना आता त्यांचे गुत्थी आणि दादी हे आवडते कॅरेक्टर्स कधीच पाहायला मिळणार नाहीत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.