मुंबई: 'हिट अँड रन' प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आणि पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याता आलेल्या सलमान खानला हायकोर्टानं दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. त्यामुळं त्याला तात्पुरता दिलासा मिळाला. मुंबई हायकोर्टानं सलामनला जामीन मंजूर केला असून त्याच्या जामीनावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सत्र न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आणि दुपारी त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर सलमाननं जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली. न्या. ठिपसे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. अॅड. हरीश साळवे यांनी सलमानतर्फे युक्तीवाद केला.
दरम्यान, सलमान खानला जामीन मंजूर झाल्यानंतरची कोर्टाच्या आदेशाची प्रत घेऊन सलमानची बहिण अलविरा सेंशन कोर्टाकडे धावली. जामीनाची प्रत देताच सलमानला घरी जाता येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.