box office : 'हेट स्टोरी -३'चे कमाल कलेक्शन, खर्चापेक्षा कमाई अधिक

Updated: Dec 7, 2015, 06:14 PM IST
box office :  'हेट स्टोरी -३'चे कमाल कलेक्शन, खर्चापेक्षा कमाई अधिक title=

 

नवी दिल्ली : पहिल्या दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर धूम केल्यानंतर 'हेट स्टोर-३ चे तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी कलेक्शन शानदार होते. चित्रपटाने रविवारी देशातर्गत बॉक्स ऑफीसमध्ये ९.०५ कोटी रूपयांची कमाई केली आहे त्यामुळे या वीक एन्डला चित्रपटाने एकूण २६.८२ कोटींचा व्यवसाय केला आहे. 

शनिवारच्या तुलनेत रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडी घट आहे. रविवारी सुट्टी असल्याने लोक आराम करणे पसंत करतात .. 

चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.७२ कोटींची कमाई केली होती. तसेच शनावारी ८.०५ कोटी रूपये कलेक्शन होता. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्शनुसार हेट स्टोरी-३ ने शुक्रवारी ९.७२, शनिवार ८.०५ आणि रविवार ९.०५ कोटी म्हणजे एकूण २६.८२ कोटींची कमाई केली आहे. 

चित्रपट बनविण्यासाठी ६.५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर चित्रपटाच्या प्रमोशनासाठी ६.७ कोटी रूपये खर्च करण्यात आला. एकूण याला १३.२ कोटी खर्च करण्यात आला. त्यामुळे आर्थिक गणित विचार करता हा चित्रपट सुपरहीट ठरला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.