प्रसिद्ध डान्सर आणि गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

 एक प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने रविवारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सपनाला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गायिका सपना हा मागील काही दिवसांपासून एका गाण्यामुळे वादात सापडली होती आणि गुडगाव पोलीस स्थानकामध्ये तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली गेली होती. 

Updated: Sep 5, 2016, 07:32 PM IST
प्रसिद्ध डान्सर आणि गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न title=

नवी दिल्ली : एक प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने रविवारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सपनाला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गायिका सपना हा मागील काही दिवसांपासून एका गाण्यामुळे वादात सापडली होती आणि गुडगाव पोलीस स्थानकामध्ये तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली गेली होती. 

सपना जवळ एक सुसाइड नोट मिळाली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या आत्महत्येमागे गुडगावचा नवाब सतपाल तंवर याला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणाची पोलीस अजून चौकशी करत आहेत.