मुंबई : सध्यातरी माझा लग्नासंबंधी कुठलाही विचार नाही, असे वक्तव्य़ स्वतः कतरिना कैफ हिने दिले आहे. सलमानसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर कतरिना आणि रनबीरमधल्या प्रेम संबंधांबद्दलच्या चर्चेला ऊत येऊ लागला.
बॉलिवूडचं सध्याचं हॉट कपल म्हणून रनबीर कपूर आणि कतरिना कैफ यांना पाहिलं जातं. त्यांच्या लग्नासंबंधीच्या अनेक अफवा आपल्या कानांवर येतचं होत्या. शिवाय या दोघांच्या लग्नाविषयी अनेक माध्यमांनीही बराच रस दाखवला.
या जोडीचे बीचवरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या लग्नाविषयीच्या चर्चेला बराचं ऊत आला होता. पण या सगळ्या अफवांना बाजूला सारून खुद्द कतरिनानेचं या विषयावर आपले मत स्पष्ट करून विषय संपवून टाकला आहे. सध्यातरी माझा लग्नासंबंधी कुठलाही विचार नाही असे वक्तव्य़ स्वतः कतरिना कैफ हिने दिले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.