अॅक्टर्सच्या स्मार्ट फिगरचे आहे हे रहस्य

बॉलीवूड अॅक्टर्स त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि फिगर मेंटेन ठेवण्यासाठी मोठी मेहनत घेतात. योग्य व्यायामासोबतच ते त्यांच्या खाण्यापिण्यावर पूर्ण लक्ष ठेवतात. जाणून घ्या फिगर मेंटेन ठेवण्यासाठी हे अॅक्टर लोक खातात तरी काय

Updated: Dec 18, 2015, 12:08 PM IST
अॅक्टर्सच्या स्मार्ट फिगरचे आहे हे रहस्य  title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अॅक्टर्स त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि फिगर मेंटेन ठेवण्यासाठी मोठी मेहनत घेतात. योग्य व्यायामासोबतच ते त्यांच्या खाण्यापिण्यावर पूर्ण लक्ष ठेवतात. जाणून घ्या फिगर मेंटेन ठेवण्यासाठी हे अॅक्टर लोक खातात तरी काय

जॉन अब्राहम नाश्त्यामध्ये ६ अंडी, ४ ब्रेड-बटर स्लाईस, १० बदाम आणि एक मोठा ग्लास ज्यूस असतो. यासोबतच तो नियमित व्यायामही करतो. 

मलाईका अरोरा सकाळी नाश्त्यामध्ये इडली, पोहा, उपमा खाते. यासोबतच ती फळेही खाते. 

ऋतिक रोशन सकाळी नाश्त्यामध्ये ४ अंडी, २ ब्राऊन ब्रेड, एक प्रोटीन शेक आणि खूप सारी ताजी फळे घेतो. 

करीना कपूर दिवसाची सुरुवात एक कप कॉफी आणि एक केळं खाऊन करते. यासोबतच तीन नाश्त्यामध्ये दोन पराठे आणि दही खाते.

सलमान खान नाश्त्यामध्ये अंडी, ब्रेड, लोणी, मिक्स भाज्या, पोळी, कमी फॅटवाले दूध याचा समावेश असतो. 

शिल्पा शेट्टी नाश्त्यामध्ये उपमा आणि चहा घेते. त्यानंतर ती व्यायाम करते. व्यायाम झाल्यानंतर प्रोटीन शेक, खजूर आणि मनुका खाते. दुपारच्या जेवणात पोळी, भाजी, चिकन आणि डाळीचा समावेश असतो. 

तुषार कपूर नाश्त्यामध्ये प्रोटीन शेक घेतो. दुपारच्या जेवणात तो तंदुरी चिकन आणि भाजीसोबत पोळ्या असा आहार घेतो. 

प्रियंका चोप्राला घरच्या खाण्याची प्रचंड आवड आहे. जे आवडते ते खावे याकडे तिचा कल असतो. मात्र त्यानंतर व्यायामही गरजेचा आहे असे तिचे मत आहे. 

राम कपूरच्या नाश्त्यात्या प्लेटमध्ये फाईड अंडी, संत्र्याचा ज्यूस अथवा नारळपाणी असते. 

बिपाशा बासू जेवणामध्ये भात खात नाही. भरपूर पाणी, भरपेट नाश्ता आणि फळे हे तिच्या स्मार्ट फिगरचे रहस्य आहे. 

सेलीना जेटली भरपूर सुका मेवा आणि फळे खाते. तसेच दिवसभरात ती ७-८ कप ग्रीन टी घेते. 

दीपिका पदुकोण सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली, उपमा अथवा डोसा खाते अथवा दोन ऑम्लेट.