भन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं.

Updated: Aug 15, 2016, 05:11 PM IST
भन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक  title=

मुंबई : संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं. पण आता रणवीरऐवजी हृतिक रोशनला ही भूमिका मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रणवीर आणि भन्सालींमध्ये वाद झाल्यामुळे रणवीरला या चित्रपटातून डच्चू देण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. 

रणीवरबरोबरच्या वादानंतर भन्सालींना शाहरुखबरोबर हा चित्रपट करायचा होता, पण चित्रपटाच्या शूटिंगला जवळपास 200 दिवस लागणार असल्यामुळे शाहरुखला हा चित्रपट करणं अशक्य होतं, त्यामुळे भन्सालींनी हृतिकला याबाबत विचारलं. 

या चित्रपटाबाबत बोलणी सुरु असताना रणवीरनं भन्सालींकडे चित्रपटाची स्क्रिप्ट मागीतली, यामुळे भन्सालींना राग आल्याचं बोललं जात आहे. भन्सालींच्या आधीच्या चित्रपटांमुळे रणवीरला बॉलीवूडमध्ये मोठं यश मिळालं असताना चित्रपटाची स्क्रिप्ट मागणं भन्सालींना पटलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.