मुंबई : 'लय भारी' चित्रपट सुपर हिट ठरला आहे, या चित्रपटातील गाण्यात रितेश देशमुखची पत्नी जेनेलियानेही एका गाण्यात लूक दिला आहे.
मराठी सिनेमात पहिल्यांदा कलाकारांची एवढी मांदियाळी दिसून येत आहे. लय भारी हा सिनेमा 1500 सिनेमा घरांमध्ये दाखवला जाणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे.
'एक व्हिलन' चित्रपटातली रितेशची अप्रतिम कामगिरी, त्याला मिळालेले यश आणि पाठोपाठ आलेला मराठीतला रांगडा माऊली यामुळे हा चित्रपट सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे.
मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाचे दिवसाला १५०० शो दाखवण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोची संख्या वाढवावी लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.