बालिका वधू मालिकेतील सुमित्राविरोधात एफआयआर

कलर्स चॅनेलवरील बालिका वधू या मालिकेतील सुमित्राची भूमिका साकारणारी स्मिता बंसलविरोधात चोरीच्या आरोपाप्रकरणी गुडगाव शहरात एफआयआर दाखल करण्यात आलाय. 

Updated: Dec 27, 2015, 01:15 PM IST
बालिका वधू मालिकेतील सुमित्राविरोधात एफआयआर title=

गुडगाव : कलर्स चॅनेलवरील बालिका वधू या मालिकेतील सुमित्राची भूमिका साकारणारी स्मिता बंसलविरोधात चोरीच्या आरोपाप्रकरणी गुडगाव शहरात एफआयआर दाखल करण्यात आलाय. 

स्मिताची एनआरआय नणंदेनेच हा आरोप केलाय. याशिवाय तिने पती, सासू आणि सासऱ्याविरोधातही हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार दाखल केलीये. याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केलाय. 

मेघा गुप्ता असे पिडीत महिलेचे नाव आहे. मेघा तिच्या पतीसह लंडनमध्ये राहत होती. ऑक्टोबरमध्ये गुडगाव पोलीस ठाण्यात तिने ही तक्रार दाखल केलीय.