सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत अवघं बॉलीवूड

दबंग सलमान खान आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करतोय. सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर एका शानदार पार्टीचं काल रात्री आयोजन करण्यात आलं होतं. 

Updated: Dec 27, 2015, 10:58 AM IST
 सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत अवघं बॉलीवूड title=

पनवेल : दबंग सलमान खान आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करतोय. सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर एका शानदार पार्टीचं काल रात्री आयोजन करण्यात आलं होतं. 

या पार्टीसाठी अवघ बॉलीवूड अवतरलं होतं. रितेश देशमुखपासून ते अनिल कपूरपर्यंत असे सारचेजण सलमानला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. 

तर जॅकलिन फर्नांडिस, कंगना रानौत आणि असीननंही या पार्टीला हजेरी लावली होती. सलमानानं हिट अँड रनप्रकरणी पीडितांच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा पूर्ण हक्क असल्याची प्रतिक्रिया दिली.