शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एका नव्या वादात अडकलेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Apr 28, 2017, 01:24 PM IST
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एका नव्या वादात अडकलेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

24 लाख 12 हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी भिवंडी तालुक्यातल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

सरवली एमआयडीसीमध्ये बेडशीट तयार करणाऱ्या कंपनीनं शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दाम्पत्यावर फसवणुकीचा आरोप केलाय. शिल्पा आणि राज यांच्यासह भागीदार दर्शित इंद्रवन शाह, उदय कोठारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.