'त्या' चित्रपटासाठी 20 दिवस सूर्यप्रकाश पाहिला नाही, सगळ्यात महागडे खलनायक; हवं तेवढं मानधन मिळालं नाही तर...

Amrish Puri Birth Anniversary : अमरीश पुरी यांनी या चित्रपटासाठी पाहिला नाही तब्बल 20 दिवस सूर्यप्रकाश 

दिक्षा पाटील | Updated: Jun 22, 2024, 04:10 PM IST
'त्या' चित्रपटासाठी 20 दिवस सूर्यप्रकाश पाहिला नाही, सगळ्यात महागडे खलनायक; हवं तेवढं मानधन मिळालं नाही तर... title=
(Photo Credit : Social Media)

Amrish Puri Birth Anniversary : बॉलिवूडचे दिग्ग्ज अभिनेता अमरीश पुरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि क्रुक खलनायक ठरले आहेत. 22 जून 1932 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या बॉलिवूडमधील करिअरच्या सुरुवात ही 1971 मध्ये 'रेशमा और शेरा' या चित्रपटातून केली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटातील त्यांती मोगॅंबो ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेली. त्यांची जागा कोणी दुसरं घेऊ शकतं असं कोणालाही वाटतं नाही. तर अभिनेता अमरीश पुरी हे त्यांच्या मानधनामुळे देखील चर्चेत असायचे. अमरीश पुरी हे त्यांच्या काळातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या खलनायकांपैकी एक होते. 

नायक ते खलनायक पर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेता अमरीश पुरी यांनी 1967 मध्ये मराठी चित्रपट 'शंततु कोर्ट चालू आहे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेशमा और शेरा' मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. त्यांनी जवळपास 50 नाटकांमध्ये काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत नशिब आजमावलं होतं. त्यांनी 30 वर्षांच्या करिअरमध्ये 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. अमरीश पुरी आजही बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट आणि सगळ्यात महागडे खलनायकांपैकी एक आहेत. 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील मोगॅंबो या भूमिकेसाठी त्यांनी इतकी मेहनत केली की जवळपास 20 दिवस त्यांनी सूर्य पाहिला देखील नव्हता. 

पाहिजे तेवढं मानधन मिळत नसेल तर चित्रपटाला द्यायचे नकार

अमरीश पुरी त्यांना हवं तेवढं मानधन मिळालं नाही तर चित्रपटाला नकार द्यायचे. 1998 मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला होता की 'एन. एन. सिप्पी यांच्या एका चित्रपटाला यासाठी नकार दिला कारण त्यांनी मानधनाविषयी जी मागणी केली होती, ती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यांना 80 लाख रुपये देण्यास नकार दिला. त्यांच्या मानधना विषयी ते खूप स्ट्रिक्ट होते. ते म्हणायचे की जेव्हा ते त्यांच्या कामात तडजोड करत नाही, तर मानधनाच्या बाबती का करू.'

हेही वाचा : 'एका दिवसासाठी 5-10 लाख...', पैसे उधळत धुमधडाक्यात लग्न करणाऱ्यांचे 'सैराट' फेम अभिनेत्यानं उघडले डोळे

अमरीश पुरी यांना  'मिस्टर इंडिया', 'तहलका' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या आयकॉनिक भूमिकांसाठी ओळखले जातात. 12 जानेवारी 2005 रोजी अमरीश पुरी यांनी 12 जानेवारी 2005 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.