नवी दिल्ली : तुम्ही ग्लॅमरस मॉडल आणि एक्टर्स यांना रॅम्पवर कॅट वॉक करताना खूपदा पाहिले असेल. पण तुम्ही कधी भूतांचा रॅम्प वॉक पाहिला नसेल तर काळजी करू नका. हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल, 'बिग बॉस' मध्ये! पहिल्याच दिवशी वेळ घालवण्यासाठी सर्व स्पर्धेकांनी भूतासारखा मेकअप करून रॅम्प वॉक केला.
खुर्चीवर झोपून काढली रात्र -
बिग बॉसच्या सर्व स्पर्धेकांनी पहिली रात्र ही विमानातील खुर्चीत झोपून काढली असून तीन सीक्रेट सोसायटीचे सदस्यांनी मात्र आरामात बेडवर झोपून रात्र काढली.
या सीक्रेट सोसायटीमधील सदस्यांना हा आराम आणि नॉमिनेशनपासून सुटका ही फक्त जोपर्यंत ते बिग बॉसची भूमिका योग्य प्रकार पार पाडत नाही, तो पर्यंतच असणार असल्याचे कळतेय.
यासाठी बाकीच्या सर्व स्पर्धकांना टास्क करून यांच्या आरामाची किंमत द्यावी लागणार आहे.
सीक्रेट सोसायटीमधील सदस्यांना पहिला टास्क दिला होता 'कुर्बानिया'. या टास्कद्वारे काही ठराविक स्पर्धेकांना बॅग देण्यात आल्या होत्या. मग, त्यांनी काही स्पर्धेकांना त्यांचे सामान पाठविले. तर काही स्पर्धेकांना मात्र, त्यांच्या गरजेच्या आणि आवश्यक वस्तूची कुर्बानियां मागितली. करिश्मा, प्रणित, सुशांत, डायंड्रा, उपेन आणि मिनिषाच्या बॅग्स पाठविल्या नाहीत.
पहिली कुर्बानी ही गरजेच्या वस्तूंची
सीक्रेट सोसायटी सदस्याकडून सर्व स्पर्धेकांना त्यांचे सामान मिळविण्याची संधी देण्यात आली होती. म्हणजे सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार होती. स्पर्धेकांनी दिलेल्या उत्तराने जर सदस्य आनंदी झाले तरच त्यांना त्याचे सामान मिळेल किंवा नाही, हे ठरणार होते.
सदस्यांनी डायंड्राला विचारले की, या सर्व स्पर्धेकांमध्ये जास्त खोटं कोण आहे. तिने उत्तर दिले की, सोनाली ही खोटी आहे. यावर ती असे ही बोलली की, ती अजूनपर्यंत तरी आमचे बोलणे झाले नाही.
डायंड्राला दुसरा प्रश्न- तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी कोणत्या नियमाचे उल्लंघन आहे का? त्यावर तिने उत्तर दिले की, 'नाही'.
सुशांतला विचारले - या स्पर्धेकांमध्ये कोणता स्पर्धेक तुम्हाला आवडत नाही. त्यांनी उत्तर दिले की, मिनिषा का? कारण तिच्या बदल त्याला फारशी माहिती नाही.
उपेन पटेलला घरातील सर्व मुलींमध्ये 'सर्वात जास्त सुंदर ते सर्वात कमी सुंदर' सांगयचे होते. नताशा, करिश्मा, सोनाली, सुकृति, मिनिषा, सोनी, डायंड्रा असे उत्तर दिले.
करिश्माने सांगितले की, तिचे मिनिषा आणि सोनालीबरोबर पुढील काळात मतभेद होण्याची शक्यता दर्शविली आहे. त्यांना विचारले की. तुम्हाला इथे कोण पसंत करत नाही. तिने सांगितले की, सोनाली तिला पसंत करत नाही अशी सांगितले.
मिनिषानी सांगितले की, सर्वात जास्त नेगेटिव्ह एटीट्यूड आतापर्यंत सोनालीचा दिसून येत आहे. पण, 24 तासात आपण कोणालाही व्यवस्थित ओळखू शकत नाही.
प्रणितने सांगितले की, गौतम गुलाटीला सोडले तर बाकी सर्व स्पर्धेक हुशार आहेत.
मग, मिनिषा, उपेन, करिश्मा, सुशांत यांना त्यांच्या बॅग्स मिळाल्या पण, डायंड्रा आणि प्रणित भट्ट यांना पुन्हा एकदा कुर्बानीलासामोर जावे लागणार होते. डायंड्राला मात्र, यांचा राग आला.
दुसरी कुर्बानी झोपेची -
सीक्रेट सोसायटीने सर्व स्पर्धेकांकडून दुसरी कुर्बानी मागितली ती म्हणजे कोणत्या तरी दोन स्पर्धेकांनी पूर्ण रात्र जागरण करून त्याच्या झोपेची कुर्बानी त्यांची होती. तेव्हा स्पर्धेकांमधील उपेन आणि प्रणित यांनी ठरविले की दोघेही जागरण करणार होते. पण, यात बदल करून प्रणितच्या जागी गौतम गुलाटी आणि उपेन दोघे रात्रभर जागरण करण्याचे ठरविले.
स्पर्धेकांकडे दुसरे कोणतेच काम नव्हते. त्यामुळे ते टाइम पास करून वेळ घालवित होते. त्यांनी सीक्रेट सोसायटीच्या काही सदस्यावर ही देखील टीका केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.