दोन मॉडेलचे आरोप : 'रोल देण्यासाठी निर्मात्याची मागणी, एक रात्र घालव'

कोलकातातील दोन मॉडेलनी मुंबईतील एका टिव्ही निर्मात्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मालिकेमध्ये काम करण्यासाठी एक रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल, असे या निर्मात्याने सांगितले.

Updated: Sep 23, 2014, 03:48 PM IST

मुंबई : कोलकातातील दोन मॉडेलनी मुंबईतील एका टिव्ही निर्मात्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मालिकेमध्ये काम करण्यासाठी एक रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल, असे या निर्मात्याने सांगितले.

मुंबई निर्माता म्हणून काम करत असल्याचे एकाने सांगितले.  त्याने मालिकेमध्ये काम करण्याचे आश्वासन देत एका करारावर स्वाक्षरी घेतली आणि ११,००० रुपये आगावू दिण्याच्या बहाण्याने एका हॉटेलवर बोलावले. त्यानंतर शुक्रवारी मी दुसऱ्या एका मॉडेल दोस्तबरोबर सायंकाळी ६ वाजता गेलो,  अशी माहिती या मॉडेलने दिली. 

दक्षिण पूर्वचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, जय देसाई नावाच्या व्यक्तीने दोन मॉडेलना कथित आपल्यासोबत रात्र घालविण्याचे सांगितले. मॉडेलच्या विरोधानंतरही या निर्मात्याने त्यांचे लैंगिक शोषण केले.

पोलिसांनी या मॉडेलच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

या दोन्हा मॉडेल आसमच्या मूळ रहिवासी आहेत. त्या आपल्या नातेवाईकांसोबत शहरात राहत होत्या. दरम्यान, पोलिसांनी सांगितले, या व्यक्तीने अन्य काही महिलांना आपल्या जाळ्यात ओढले असण्याची शक्यता आहे. आरोपी स्वत:ला मुंबईत प्रसिद्ध निर्माता असल्याचा दावा केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.