मुंबई : कतरिना आणि रणबीर ब्रेक-अपच्या बातम्या अजूनही संपत नाहीत, तोपर्यंतच आता बी-टाऊन आता अजून एका घटस्फोटाच्या घटनेने हादरले आहे.
हा घटस्फोट आहे फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना अख्तरचा. अजून याविषयी काही अधिकृत खुलासा झाला नसला तरी त्यांच्या सेपरेशनच्या बातम्या आता सर्वत्र चर्चेत आहेत.
फरहान आणि अधुना 'दिल चाहता है' चित्रपटाच्या वेळी पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर २००० साली त्यांनी विवाह केला होता.
पण, आता बराच काळ त्यांच्यात वाढणाऱ्या वादांमुळे ते वेगळे होणार आहेत. अधुना ही फरहानपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे.