दीपिकाला तिच्या जवळच्या व्यक्तीने भेट दिला प्रेशर कुकर

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने भेट म्हणून प्रेशर कुकर दिलाय. या भेटीचा फोटो दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Updated: Dec 18, 2016, 03:03 PM IST
दीपिकाला तिच्या जवळच्या व्यक्तीने भेट दिला प्रेशर कुकर title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने भेट म्हणून प्रेशर कुकर दिलाय. या भेटीचा फोटो दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

ही जवळची व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आहे. बॉलीवूडची ही मम्मी कोरिओग्राफर फराहने दीपिकाला सिनेमाच्या सेटवर घरच्या जेवणाची चव चाखता यावी यासाठी तीने ही भेट दिलीये.  

या भेटीबद्दल दीपिकाने फराहचे आभार मानलेत. आईचे प्रेम.. धन्यवाद मम्मी! असं तिने शेअर केलेल्या फोटोसोबत म्हटलंय. 

 

Ma ka Pyaar... Thank You Mommy!@farahkhankunder #nightshoot #dinner

A photo posted by Deepika Padukone (@deepikapadukone) on