म्हणून आमिर खान जाणार कोल्हापूरला

बॉलीवूड अभिनेता आमिर खान सोमवारी कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापुरात असलेल्या मोतीबाग आखाड्याला आमिर भेट देणार आहे.

Updated: Dec 17, 2016, 09:08 PM IST
म्हणून आमिर खान जाणार कोल्हापूरला title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान सोमवारी कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापुरात असलेल्या मोतीबाग आखाड्याला आमिर भेट देणार आहे. मोतीबाग आखाड्यानं कुस्तीमध्ये भारताचं नाव रोशन केलं आहे. मोतीबाग आखाडा हा भारतातल्या सगळ्यात जुन्या आखाड्यांपैकी एक आहे.

रुस्तम ए हिंद दादू चौघुले यांचा मोतीबाग आखाडा आहे. आमिर खानचा आगामी चित्रपट दंगल हा कुस्तीपटूच्या आयुष्यावर आधारित आहे. आमिरच्या दंगलचा ट्रेलर बघून मोतीबाग आखाड्यानं आमीरला कोल्हापूरला बोलावण्याचं निमंत्रण दिलं. आमिरनंही हे निमंत्रण स्वीकारलं आहे.

मोतीबाग आखाड्यातले कुस्तीपटू आमिर खानला त्यांचं कौशल्य दाखवणार आहेत. याबरोबरच हे पहलवान आमिरबरोबर दूध प्यायची स्पर्धाही लावणार असल्याचं मोतीबाग आखाड्याकडून सांगण्यात आलं आहे.