'दिल दोस्ती'तल्या आशूची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं. सुजय, आशू, कैवल्य, रेश्मा, मीनल आणि अॅना या सहा जणांना या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 

Updated: Jul 9, 2016, 05:09 PM IST
'दिल दोस्ती'तल्या आशूची बॉलीवूडमध्ये एन्ट्री  title=

मुंबई : दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं. सुजय, आशू, कैवल्य, रेश्मा, मीनल आणि अॅना या सहा जणांना या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच मालिकेमधला आशू म्हणजेच पुष्कराज चिरपुटकरनं बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. 

'बुधिया सिंग- बॉर्न टू रन' या चित्रपटातून पुष्कराज बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. 5 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. धावपटू बुधिया सिंग यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी कोचच्या भूमिकेत तर मयुर पटोलेनं बुधिया सिंगची भूमिका केली आहे. या चित्रपटामध्ये श्रुती मराठेही दिसणार आहे. 

बुधिया सिंग यांनी एकूण 48 मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. फक्त पाच वर्षांचा असताना बुधिया सिंग भुवनेश्वर ते पुरी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.