'ओह माय गॉड'चं शूटिंग थांबवण्यासाठी आमिरनं दिली होती ८ कोटींची ऑफर?

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सिनेमा ‘पीके’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमानं केवळ चार दिवसांत १०० करोडची कमाई केलीय. पण, याच सिनेमाबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर येतेय.  

Updated: Dec 24, 2014, 11:06 AM IST
'ओह माय गॉड'चं शूटिंग थांबवण्यासाठी आमिरनं दिली होती ८ कोटींची ऑफर? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सिनेमा ‘पीके’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमानं केवळ चार दिवसांत १०० करोडची कमाई केलीय. पण, याच सिनेमाबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर येतेय.  

एका दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, ‘पीके’ सिनेमाचा निर्माता, दिग्दर्शकानं अक्षय कुमार अभिनित 
‘ओह माय गॉड’चा दिग्दर्शक उमेश शुक्ला यांना त्यांच्या सिनेमाचं शूटिंग थांबविण्यासाठी तब्बल आठ करोड रुपयांची ऑफर दिली होती. 

उल्लेखनीय म्हणजे, ‘पीके’ पाहताना ‘ओह माय गॉड’ या सिनेमाची आणि त्याच्या कथानकाची आठवण नक्की होते. आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांना ‘ओह माय गॉड’ सिनेमाचं शूटींग थांबवण्याची इच्छा होती, कारण त्यांना ‘पीके’ हा सिनेमा ‘ओह माय गॉड’ या सिनेमाच्या अगोदर प्रदर्शित करण्याची इच्छा होती, असा यामध्ये दावा करण्यात आलाय.

आमिर खान आणि ‘पीके’च्या दिग्दर्शकानं ‘ओह माय गॉड’ची स्टोरीलाईन ‘पीके’शी साधर्म्य साधत असल्याकारणानं हा निष्पळ प्रयत्न केल्याचा दावा, यामध्ये करण्यात आलाय. 

दरम्यान, आमिरनं मात्र हा दावा खोडून केलाय. बॉलिवूडमध्ये जवळपास १०० सिनेमे एकाच थीमवर आधारित असतात... पण, याचा हा अर्थ नाही की आम्ही दुसऱ्या सिनेमाची कॉपी करतोय, असं आमिरनं म्हटलंय. ही बातमी धादांत खोटी असल्याचं आमिरनं म्हटलंय. 

अक्षय कुमार अभिनेत ‘ओह माय गॉड’ हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनीही उचलून धरलं होतं. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं चांगली कामगिरी केली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.