व्हिडिओ : दीपिकाचा रणवीरसाठी 'फ्लाईंग किस'

आपलं प्रेम जगजाहीर न करता एकमेकांना समजेल अशा भाषेत बोलणं जरा कठिणच... त्यातूनही ते सेलिब्रिटी असले तर हे जवळ जवळ अशक्यच... असंच काहीसं घडतंय ते दीपिका आणि रणवीर या लव्हबर्डच्या बाबतीत... 

Updated: Jul 5, 2016, 09:06 PM IST
व्हिडिओ : दीपिकाचा रणवीरसाठी 'फ्लाईंग किस' title=

मुंबई : आपलं प्रेम जगजाहीर न करता एकमेकांना समजेल अशा भाषेत बोलणं जरा कठिणच... त्यातूनही ते सेलिब्रिटी असले तर हे जवळ जवळ अशक्यच... असंच काहीसं घडतंय ते दीपिका आणि रणवीर या लव्हबर्डच्या बाबतीत... 

दोघांनीही एकमेकांसाठी असलेलं आपलं प्रेम कधीही ओरडून जगाला सांगितलं नसलं तरी एकमेकांना समजेल अशा भाषेत हे दोघेही नेहमीच बोलत असतात... पण, त्यांची ही भाषा त्यांच्या चाहत्यांपर्यंतही पोहचायला फार वेळ लागत नाही...

हेच घडलं आयफा अॅवॉर्ड दरम्यान... रणवीरनं आपल्या अॅवॉर्ड स्वीकारताना स्पीचमध्ये दीपिकाचा आवर्जून केलेला उल्लेख आणि दीपिकानं आपल्या परफॉर्मन्सनंतर रणवीरसाठी दिलेला 'फ्लाईंग किस' त्यांच्या चाहत्यांना खूप काही सांगून गेला.

तोच हा क्षण... पाहा...