अनुष्का-विराटने एकत्र पाहिला 'सुल्तान'

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली यांच्यातील दुरावा आता कमी झाला आहे. दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. अनुष्काच्या आग्रहामुळे विराटसाठी सुल्तान सिनेमाचं एक स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यशराज फिल्म स्टुडिओमध्ये दोघांनी एकत्र हा सिनेमा पाहिला. 

Updated: Jul 5, 2016, 08:28 PM IST
अनुष्का-विराटने एकत्र पाहिला 'सुल्तान' title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली यांच्यातील दुरावा आता कमी झाला आहे. दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. अनुष्काच्या आग्रहामुळे विराटसाठी सुल्तान सिनेमाचं एक स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यशराज फिल्म स्टुडिओमध्ये दोघांनी एकत्र हा सिनेमा पाहिला. 

अनुष्का या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. ६ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का-विराटने एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. विराट आणि अनुष्काने मात्र या मुद्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. 

टी-२० वर्ल्डकपमध्ये विराटच्या तुफानी कामगिरीवर अनुष्काने विराटला मॅसेज करून शुभेच्छा दिल्या होत्या. तर त्यानंतर सोशल मीडियावर अनुष्काच्या नावाने सुरु असलेल्या जोक्सवरुन विराटने संताप व्यक्त केला होता. आता विराट-अनुष्का पुन्हा एकत्र आले आहेत.

पाहा व्हिडिओ