रणवीरच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाच्या वडिलांची प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सध्या थंडावल्यात. गेल्याच आठवड्यात एका पार्टीदरम्यान हे जोडपं हातात हात घातलेलं दिसलं होतं. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या तरी थांबल्यात. 

Updated: Dec 2, 2016, 07:52 AM IST
रणवीरच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाच्या वडिलांची प्रतिक्रिया title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सध्या थंडावल्यात. गेल्याच आठवड्यात एका पार्टीदरम्यान हे जोडपं हातात हात घातलेलं दिसलं होतं. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या तरी थांबल्यात. 

रणवीर सिंह नेहमीच आपल्या नात्याबाबत खुलेपणाने बोलतो. कॉफी विथ करणध्येही रणवीरने दीपिका ही मॅरेज मटेरियल असल्याचे म्हटले होते. यावर आता दीपिकाचे व़डील प्रकाश पदुकोण यांनी आपले मत व्यक्त केलेय.

इंग्रजी वृत्तपत्र मिड डेशी बातचीत करताना प्रकाश पदुकोण म्हणाले, ते दोघेही समजूतदार आहेत आणि काय करायचे हे जाणतात. दीपिकाला स्वत:चे निर्णय स्व:त घेण्याचे स्वातंत्र्य मी दिलेय. तिला काय करायचे आहे याचा निर्णय ती घेईल. 

सध्या रणवीर आपल्या बेफिक्रे या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे दीपिका आपल्या पहिल्यावहिल्या हॉलीवूड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.