‘व्हर्जिन’ला आक्षेप; चिडली दीपिका पादूकोण

केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डानं (सीबीएफसी) फाईन्डिंग फॅनी या चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘व्हर्जिन’ शब्दावर घेतलेल्या आक्षेपानं चित्रपटाची हिरोईन दीपिका पादूकोण भलतीच चिडलीय. 

Updated: Sep 5, 2014, 11:14 PM IST
‘व्हर्जिन’ला आक्षेप; चिडली दीपिका पादूकोण  title=

मुंबई : केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डानं (सीबीएफसी) फाईन्डिंग फॅनी या चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘व्हर्जिन’ शब्दावर घेतलेल्या आक्षेपानं चित्रपटाची हिरोईन दीपिका पादूकोण भलतीच चिडलीय. 

बोर्डानं घेतलेल्या आक्षेपामुळे ‘फाईन्डिंग फॅनी’च्या निर्मात्यांना या चित्रपटाच्या काही दृश्यांत काटछाटही करावी लागणार आहे. पण, 28 वर्षीय दीपिकानं मात्र बोर्डाच्या या निर्णयाचा उघड-उघड विरोध व्यक्त केलाय. 
बोर्डानं दिलेले दिशानिर्देश असंगत असल्याचं दीपिकानं म्हटलंय. एका टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये दीपिकानं नुकतीच हजेरी लावली. यावेळी ती बोलत होती. 

‘बोर्डाचा हा आक्षेप अयोग्य आहे, असं मला वाटतंय. माझ्या मते, चित्रपटाला सर्टिफिकेट देण्याचं कोणतीही एक पद्धती नाही. प्रत्येक सहा महिन्याला नियम बदलतात. इथं बोलणं आणि कृतीमध्ये कोणतंही साम्य दिसत नाही’ असं म्हणत दीपिकानं सीबीएफसीच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.  

‘चित्रपट पाहताना प्रत्येक गोष्टीला एक विशेष दृश्य किंवा सिनेमाच्या संदर्भात पाहिलं जायला हवं... तुम्ही फक्त एकाच शब्दावर आक्षेप घेऊन आम्ही याला परवानगी देणार नाही असं म्हणू शकत नाही’ असंही दीपिकानं आपली चीड व्यक्त करत म्हटलंय. ‘फाईंन्डिग फॅनी’ १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.