दबंग गर्ल सोनाक्षीचा कार्यक्रमातून काढता पाय

अखेर तिथला सगळा सावळागोंधळ पाहून सोनाक्षीने अवघ्या काही मिनिटात तिथून माघारी निघणं पसंत केलं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 7, 2017, 10:23 PM IST
दबंग गर्ल सोनाक्षीचा कार्यक्रमातून काढता पाय title=

मुंबई : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला चाहत्यांच्या अतिउत्साहापुढे अक्षरशः एका कार्यक्रमातून पळ काढावा लागला. त्याचं झालं असं मुंबईत एका फिटनेस सेंटरच्या उदघाटनासाठी सोनाक्षीला आमंत्रित करण्यात आलं होतं. 

सोनाक्षी उदघाटनासाठी दाखल झाली खरी मात्र तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी तिला गराडा घातला. सोनाक्षीला कार्यक्रमासाठी आतही जाता येईना त्यामुळे सोनाक्षी चांगलीच वैतागली होती.

 तिने आयोजकांकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर तिथला सगळा सावळागोंधळ पाहून सोनाक्षीने अवघ्या काही मिनिटात तिथून माघारी निघणं पसंत केलं.