'दीपिकानं जे दाखवलं तेच तर दिसलं'

नुकताच अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या ‘क्लीवेज शो’वर झालेल्या वादानंतर अनेकांनी दीपिकाची बाजू घेतली. पण, आता मात्र अभिनेत्री पूजा बेदी हिनं या वादाला वेगळं वळण दिलंय. 

Updated: Sep 18, 2014, 08:31 AM IST
'दीपिकानं जे दाखवलं तेच तर दिसलं' title=

मुंबई : नुकताच अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या ‘क्लीवेज शो’वर झालेल्या वादानंतर अनेकांनी दीपिकाची बाजू घेतली. पण, आता मात्र अभिनेत्री पूजा बेदी हिनं या वादाला वेगळं वळण दिलंय. 

एकीकडे बॉलिवूडचे अनेक चेहरे दीपिकाला सपोर्ट करताना दिसतायत तर दुसरीकडे पूजा बेदी हिनं हे सगळं प्रकरणच आधारहीन असल्याचं म्हटलंय. ‘जेव्हा आपण बरोबरीच्या बाता मारतो तेव्हा आपण आपला अति-संवेदनशीलपणाही दाखवतोय. जेव्हा आपण शाहरुख आणि ऋतिकचे सिक्स पॅक्स अॅब्ज बघतो तेव्हा तर आपल्याला कोणता प्रॉब्लेम नसतो, तेव्हा आपण त्यांची स्तुती करतो... आणि मग स्त्रीबद्दल आपलं वागणं वेगळं का ठरतं?’ असं पूजा बेदीला वाटतंय. 

‘जेव्हा तुम्ही एक पल्बिक फिगर असता तेव्हा एखाद्या मीडिया इव्हेंटमध्ये तुमच्या नेल पॉलिशपासून चप्पलांपर्यंत कॅमेऱ्याची नजर असते. ही एका सेलिब्रिटीची जबाबादारी आहे की कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वीच त्यानं ठरवावं की आपल्याला लोकांना काय दाखवायचंय आणि काय नाही’ असं म्हणत पूजानं सरळसरळ दीपिकावरच निशाणा साधलाय.

महिला अधिकारांच्या गोष्टी करत, मी जे दाखवत होते त्यावर तुमची नजर गेलीच कशी? असा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे सरळसरळ मूर्खपणा आहे. आपण प्रत्येक गोष्टीवर आपल्या नजरेतून प्रतिक्रिया देतो जो आपल्यासाठी योग्य असतो, पण आपल्याला दुसऱ्या बाजूवरही लक्ष द्यायला हवं, असं पूजा म्हणतेय.

नुकतंच दीपिकानं एका वर्तमानपत्राच्या एका ‘बातमीवर’ आक्षेप घेत ट्विटरवर आपला राग व्यक्त केला होता. या बातमीत दीपिकाच्या क्विवेजवर फोकस करण्यात आला होता... यावर, मी एक महिला आहे आणि माझ्याकडे ‘होय मी स्त्री आहे, मला स्तन आहेत... तुम्हाला काही प्रॉब्लेम?’ असं सोशल वेबसाईट ट्विटरवर म्हणत दीपिका उसळली होती. त्यानंतर अनेकांनी दीपिकाला पाठिंबा दर्शवला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.