कैदी संजय दत्तचा पगार वाढणार

अभिनेता संजय दत्त याचा पगार वाढणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार संजय दत्तचा पगार १५ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे संजय दत्तला आता  दरमाह १००० ते १२०० पगार मिळेल. 

Updated: Sep 17, 2014, 09:53 PM IST
कैदी संजय दत्तचा पगार वाढणार title=

 मुंबई : अभिनेता संजय दत्त याचा पगार वाढणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार संजय दत्तचा पगार १५ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे संजय दत्तला आता  दरमाह १००० ते १२०० पगार मिळेल. 

हा पगार संजय दत्तच्या कामावर ठरवला जाईल. संजय दत्तला नवीन जीआरनुसार ४० रुपये प्रतिदिन पगार मिळेल. याआधी संजय दत्तला ८०० ते १००० दरमाह पगार मिळत होता. ९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींकडील एके-५६ ही रायफल संजय दत्तकडे सापडली होती. बेकायदा शस्त्र बाळगणे या गुन्ह्याखाली संजय दत्तला न्यायालायनं ५ वर्षांचा शिक्षा सुनावली आहे. 

संजय दत्तने आधीच १८ महिन्यांची शिक्षा भोगली होती. आणि उर्वरीत ४२ महीने शिक्षा संजय दत्त पुण्याच्या येरवडा जेलमध्ये भोगत आहे. राज्य सरकारने जो जीआर काढल्या त्यानुसार चार प्रकारच्या कैद्यांच्या पगारात वाढ झाली आहे. कुशल कामगार कैदी, अर्धकुशल कामगार कैदी, अकुशल कामगार क़ैदी अाणि खुला कामगार क़ैदी अशा चार प्रकारचे कैदी येरवडा जेलमध्ये आहेत. 

संजय दत्त अकुशल कामगार कैदी प्रकारात मोडतो. नवीन जी आर नुसार कुशल कामगार कैद्यांना आता प्रतिदिन - ४० रुपये ते ५५ रुपये वेतन मिळेल. तर अर्धकुशल कामगार कैद्यांना आता प्रतिदिन ३५ रुपये ते ५० रुपये वेतन मिळेल. तसेच अकुशल कामगार कैद्यांना आता प्रतिदिन ४० रुपये ते ५० रुपये वेतन तर खुला कामगार कैद्यांना आता प्रतिदिन ७० रुपये प्रतिदिन वेतन नव्या जीआर प्रमाणे मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.