ब्राव्होलाही लागलं 'झिंगाट'चं याड

सैराट चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तूफान यश मिळत आहे.

Updated: May 6, 2016, 07:03 PM IST
ब्राव्होलाही लागलं 'झिंगाट'चं याड title=

मुंबई: सैराट चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तूफान यश मिळत आहे. आत्तापर्यंत सैराट चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २५ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. 

या चित्रपटाच्या सगळ्याच गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सैराटमधल्या झिंगाट या गाण्यावर तर अख्खा महाराष्ट्र थिरकत आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्होचा झिंगाट गाण्यावरचा डब डान्स सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. 

पाहा ब्राव्होचा झिंगाट डान्स