मुंबई: इमरान हाशमीची मुख्य भूमिका असलेला अजहर हा चित्रपट कोर्ट कचेरीच्या वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. क्रिकेटर अजहरची बायको संगीता बिजलानी आणि माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर कोर्टात जायच्या तयारीमध्ये आहेत.
या चित्रपटामध्ये नर्गीस फक्रीनं संगीता बिजलानीची भूमिका केली आहे. हा चित्रपट संगीतानं बघितला नसला तरी येत्या काही दिवसांमध्ये ती हा चित्रपट पाहण्याची मागणी करू शकते. जर चित्रपटामध्ये नर्गीसची भूमिका आक्षेपार्ह असेल तर मात्र संगीता या चित्रपटाविरोधात कोर्टात जाऊ शकते.
अजहरवर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपामध्ये मनोज प्रभाकर हा एक महत्त्वाचा साक्षीदार होता. हा चित्रपट अजहरच्या आयुष्यावर असल्यामुळे अजहरबाबतची चांगली बाजू चित्रपटात मांडली असेल, असं मनोज प्रभाकरला वाटत आहे.
तसंच या चित्रपटात अजहरला पीडित म्हणून दाखवण्यात आलं असेल आणि मला व्हिलन दाखवण्यात आलं असेल तर मला योग्य तो निर्णय घ्याला लागेल असंही मनोज प्रभाकर म्हणाला आहे.