दंगलमुळे 'बुक माय शो'चे सर्व्हर झाले होते डाऊन

आमिर खानचा बहुप्रतिक्षित दंगल सिनेमा आज अखेर रिलीज झालाय. रिलीज होण्याआधीच या सिनेमाची मोठी चर्चा होती. या सिनेमाच्या ट्रेलर तसेच गाण्याला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. 

Updated: Dec 23, 2016, 04:04 PM IST
दंगलमुळे 'बुक माय शो'चे सर्व्हर झाले होते डाऊन title=

मुंबई : आमिर खानचा बहुप्रतिक्षित दंगल सिनेमा आज अखेर रिलीज झालाय. रिलीज होण्याआधीच या सिनेमाची मोठी चर्चा होती. या सिनेमाच्या ट्रेलर तसेच गाण्याला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. 

या सिनेमासाठी अनेकांनी शनिवारी आणि रविवारीसाठी प्री-बुकिंग केले होते. मात्र लोडमुळे 'बुक माय शो' या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाले होते. 

बुक माय शोच्या पेजवर “Error. This page can’t be displayed. Contact support for additional information. The incident ID is: N/A.” असा एरर येत होता. मात्र काही वेळानंतर ही वेबसाईट सुरु झाली.

दंगल सिनेमासाठी सर्वच ठिकाणचे बुकिंग फुल्ल झालेय. फर्स्ट डे फर्स्ट शोला लोकांनी मोठा प्रतिसाद मिळालाय.