लाच दिल्यानंतरच प्रदर्शित झाले 'किक', 'सिंघम रिटर्न्स'?

मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची ‘कॅटेगिरी’ ठरवण्याची जबाबदारी ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’वर सोपवण्यात आलीय. पण, राकेश कुमारच्या अटकेनंतर ही ‘कॅटेगिरी’ कशी ठरविली जाते, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात झालंय. 

Updated: Aug 20, 2014, 10:16 AM IST
लाच दिल्यानंतरच प्रदर्शित झाले 'किक', 'सिंघम रिटर्न्स'? title=

मुंबई : मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची ‘कॅटेगिरी’ ठरवण्याची जबाबदारी ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’वर सोपवण्यात आलीय. पण, राकेश कुमारच्या अटकेनंतर ही ‘कॅटेगिरी’ कशी ठरविली जाते, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात झालंय. 

‘सीबीएफसी’चे सीईओ राकेश कुमार यांच्या अटकेनंतर बॉलिवूडचा ‘डर्टी पिक्चर’च सगळ्यांसमोर उघड झालाय. नुकतेच प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘किक’ आणि अजय देवगनचा ‘सिंघम रिटर्न्स’च्या निर्मात्यांकडेही आता बोट दाखवलं जातंय. या निर्मात्यांनीही सेन्सॉर बोर्डाला पैसे देऊन आपल्या सिनेमांसाठी सिर्टिफिकेट खरेदी केलं, असा आरोप केला जातोय. 

राकेशच्या अटकेनंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. सिनेमांना सर्टिफिकेट कसं दिलं जातं? मोठ्या पडद्यावर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठीही लाच देणं अनेकांना गरजेचं झालंय? कोणकोणते सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी याच मार्गानं गेलेत? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडलेत.  

सिनेमांना सर्टिफिकेट देण्यासाठी आपल्या एजंट आणि मेंबर्सच्या हातानं लाच घेण्याचा राकेशवर आरोप ठेवण्यात आलाय. सीबीआयनं केलेल्या दाव्यानुसार, मोठे कलाकार आणि बॉलिवूडचे आणखी काही ओळखीच्या सिनेनिर्मात्यांनी आपल्या सिनेमांना सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी राकेश कुमारला लाच दिलीय. 

सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं राकेश कुमारला निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय. कुमारनं ज्या सिनेमांना मंजुरी दिलीय त्या सगळ्या सिनेमांची चौकशी होतेय. दरम्यान, राकेश कुमार याचे वकील महेश वासवानी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.