बॉलिवूडचा हा अभिनेता विराटचा फॅन, केला विराट सारखा हेअर कट

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे आज लाखो फॅन्स आहेत.

Updated: Mar 2, 2017, 08:49 AM IST
बॉलिवूडचा हा अभिनेता विराटचा फॅन, केला विराट सारखा हेअर कट title=

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीचे आज लाखो फॅन्स आहेत. विराटच्या कामगिरीवर परदेशातील लोकंही त्याचं कौतूक करतात. पण बॉलिवूडमध्येही विराटचा एक खूप मोठा फॅन आहे. ज्याने विराट सारखंच हेअर कट केला आहे.

बॉलिवूडचा तो स्टार आहे वरुण धवन. वरुणने विराट सारखाच हेअर कट केला आहे. सोबतच त्याने विराट आणि त्याचा फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. वरुणने हेअर सलूनमधला त्याचा फोटो शेअर केला आहे. वरुणचा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. शशांक खैतान दिग्दर्शित हा सिनेमा १० मार्चला रिलीज होतो आहे.