तारक मेहता यांचं अहमदाबादमध्ये निधन

मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या जगण्यातलं मर्म अचूकपणे शब्दबद्ध करणारे प्रसिद्ध लेखक तारक मेहता यांचं आज अहमदाबादमध्ये निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 

Updated: Mar 1, 2017, 04:20 PM IST
तारक मेहता यांचं अहमदाबादमध्ये निधन title=

मुंबई : मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या जगण्यातलं मर्म अचूकपणे शब्दबद्ध करणारे प्रसिद्ध लेखक तारक मेहता यांचं आज अहमदाबादमध्ये निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 

सध्या स्मॉल स्क्रीनवर गाजत असलेल्या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे ते लेखक होते. याआधी एका गुजराती वर्तमानपत्रात ते सदर लिहित असत. आणि याच लेखांचं मिळून पुढे पुस्तक आलं आणि या पुस्तकावर आधारित असलेली तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका वर्षानुवर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. 

2015मध्ये तारक मेहता यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. एकूण निर्भेळ विनोदांची अचूक नस ओळखणारा एक नर्मविनोदी लेखक आज काळाच्या पडद्याआड गेल्यानं चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.