मुंबई : दबंग खान सलमानवर बॉलिवूड सध्या ५०० कोटींचा सट्टा खेळतंय. एकीकडे सलमान खानच्या हिट अॅन्ड रन खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्याचवेळी दुसरीकडे बॉलिवूड सल्लू मियावर ५०० कोटी खर्च करतंय.
२०१५-१६ हे वर्ष सलमान आणि त्याच्या करीयरसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या वर्षात त्याच्या प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये, अनेक बिग बजट आणि काही महत्त्वाकांक्षी सिनेमांचा समावेश असणार आहे.
'बजरंगी भाइजान' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सलमान खान, करीना कपुर स्टारर या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय एक था टायगर फेम डिरेक्टर कबीर खान... बाह्मण आणि मुसलमान जोडप्याची प्रेम कहाणी यात रेखाटण्यात आली आहे.. या सिनेमाचं ८० टक्क्यांहून जास्त शुटींग पूर्ण झालं असून, ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
मैने प्यार किया असो, हम आपके है कोन?, किंवा हम साथ साथ है... सूरज बरजातिया यांच्या सिनेमांतून त्यानं साकारलेली 'प्रेम' या व्यक्तरेखेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक वर्षांपासून सूरज बरजातिया यांच्या सिनेमात तो साकारत असलेली प्रेम ही त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. आता त्याचा हाच अवतार आपल्याला आगामी प्रेम रतन धन पायो या सिनेमात पुन्हा एकद पहायला मिळेल.. तब्बल १५ वर्षांनी सलमान आणि सूरज बरजातिया एकत्र काम करत असल्यामुळे या सिनेमाकडून नक्कीच सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.. सिनेमाचं बजेट तब्बल ८० कोटींच असणार आहे. राजश्री प्रॉडक्शनचा हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक बजेट असलेला सिनेमा असणार आहे..
अनिस बाझमी यांच्या नो एन्ट्री या सिनेमाचा सिक्वेल येत असल्याची चर्चा सध्या बॉलिवुडमध्ये रंगतेय. या सिनेमाची ऑफिशियली घोषणा झाली नसली, तरी हा सिनेमा सध्या त्याच्या आगामी काही प्रॉजेक्ट्सच्या पाइपनलाईन मध्ये असल्याची चर्चा सूत्रांकडून कळतेय.
याच बरोबर सलमानच्या आगामी काही प्रोजेक्टेसमध्ये करण जोहरचा शुद्धी, अरबाझ खानचा दबंग ३, डेविड धवनचा पार्टनर २ आणि यशराज बॅनरच्या सुलतान या सिनेमांचाही समावेश आहे. यात सुलतान या सिनेमाविषयी विशेष उत्सुकता आहे कारण या सिनेमात दीपिका पादुकोण आणि सलमान खान पहिल्यादाच एकत्र पहायला मिळतील. गुंडे फेम दिगदर्शक अली अब्बास झफर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सलमान खानवर तब्बल ५०० कोटींचा सट्टा बॉलिवूडमध्ये खेळला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.