अभिनेत्री पूजा हेगडे झाली हृतिक रोशनवर फिदा

मोहेंजो दारो या सिनेमामध्ये हृतिकसोबत अभिनय करणारी पूजा हेगडेला विश्वास होत नाही आहे की तिने बॉलिवूडच्या हँडसम अभिनेत्यासोबत तिचं करिअर सुरु केलं. हृतिक आणि पूजाची जोडी या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. हृतिकने देखील पूजाचं कौतूक केलं आहे. त्याने म्हटलं आहे की येणारी वेळ ही पूजाची आहे.

Updated: Jul 21, 2016, 06:33 PM IST
अभिनेत्री पूजा हेगडे झाली हृतिक रोशनवर फिदा title=

मुंबई : मोहेंजो दारो या सिनेमामध्ये हृतिकसोबत अभिनय करणारी पूजा हेगडेला विश्वास होत नाही आहे की तिने बॉलिवूडच्या हँडसम अभिनेत्यासोबत तिचं करिअर सुरु केलं. हृतिक आणि पूजाची जोडी या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. हृतिकने देखील पूजाचं कौतूक केलं आहे. त्याने म्हटलं आहे की येणारी वेळ ही पूजाची आहे.

पूजा म्हणते की, हे तिचं ड्रीम डेब्यू आहे. एक खास गोष्ट तिने सांगितली की हृतिकचा जोधा अकबर हा सिनेमा जेव्हा तिने सिनेमागृहात पाहिला तेव्हाच ती त्याची चाहती झाली.

पूजा म्हणते की, तिला वाटलं नव्हतं की ती कधी हृतिकसोबत काम करेल. 'मोहेंजो दारो'चं पूजाकडून खूप कौतूक होतंय. तिचं म्हणणं आहे की, सिनेमासाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे. 

हृतिक आणि पूजा सकाळी साडे चार वाजता शूटींगसाठी तयार व्हायचे. भूजच्या तीव्र अशा गरमीत 100 दिवस त्यांनी शूटिंग केली. हृतिक आणि पूजा शिवाय कबीर बेदी आणि अरुणोदय सिंह हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. १२ ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार आहे.