अभिनेत्री असिन अडकली विवाहबंधनात

बॉलीवूडची अभिनेत्री असिन ही विवाहबंधनात अडकली आहे. असिनने ख्रिश्चन पद्धतीने दिल्लीतील एका चर्चमध्ये लग्न केलं आहे.

Updated: Jan 19, 2016, 05:40 PM IST
अभिनेत्री असिन अडकली विवाहबंधनात title=

नवी दिल्ली : बॉलीवूडची अभिनेत्री असिन ही विवाहबंधनात अडकली आहे. असिनने ख्रिश्चन पद्धतीने दिल्लीतील एका चर्चमध्ये लग्न केलं आहे.

आज पुन्हा हिंदू पद्धतीने दिल्लीतील ड्युसित देवराना हॉटेलमध्ये त्यांचं लग्न होणार आहे. असिनने बॉलीवूडच्या फक्त एका अभिनेत्याला लग्नात आमंत्रीत केलं आहे.

दिल्लीत फक्त अक्षय कुमार हा एकटाच अभिनेता असिनच्या लग्नात उपस्थित होता.

२३ जानेवारीला मुंबईत असिनच्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडच्या इतर कलाकारांना आंमत्रित केलं जाणार आहे. त्यामुळे तेथे अनेक कलाकार हजेरी लावतील.