'मंदना बिग बॉसमधून बाहेर हो, नाहीतर...'

'बिग बॉस सीझन ९' आता अंतिम टप्प्यात आहे... सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या या टप्प्यापर्यंत टिकून राहणाऱ्या मंदना करीमीला आता मात्र जोरदार झटका लागलाय. 

Updated: Jan 19, 2016, 03:29 PM IST
'मंदना बिग बॉसमधून बाहेर हो, नाहीतर...' title=

मुंबई : 'बिग बॉस सीझन ९' आता अंतिम टप्प्यात आहे... सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या या टप्प्यापर्यंत टिकून राहणाऱ्या मंदना करीमीला आता मात्र जोरदार झटका लागलाय. 

या कार्यक्रमातून लवकरात लवकर बाहेर पडली नाहीस, तर महागात पडेल अशा आशयाची धमकी मंदनाला या कार्यक्रमात देण्यात आलीय. ही धमकी देणारं दुसरं - तिसरं कुणीही नसून एकता कपूर आहे.

मंदनाचा 'क्या कूल है हम ३' हा चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी बिग बॉसच्या घरात दाखल झाले ते एकता कपूरचा संदेश घेऊनच... 

'मंदना तू माझी 'क्या कूल है हम ३' साईन केली होती. काही दिवसांसाठी तू बिग बॉसच्या घरात गेली. आता तू घरच्या बाहेर प़ड अन्यथा तुझ्यावर पाच करोडोंची केस दाखल होऊ शकते' अशी धमकीच एकता कपूरनं एका व्हिडिओतून मंदनाला दिलीय. 

हे पाहिल्यानंतर मात्र मंदनाला रडू आवरणं कठिण झालं.