Bigg Boss 9: रिमी सेन जगासमोर रडल्यानंतर तिच्या आईने गुपीत उघड केलं

 बिग बॉसच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की कोणताही सदस्य बंद आहे आणि तो घरातून बाहेर येण्यासाठी विनवण्या करीत आहे. पण या सिझनमध्ये वेगळं घडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानशी बोलताना अभिनेत्री रिमी सेन भावूक झाली आणि ढसाढसा रडली. सलमानला तिने घराबाहेर जाण्याची विनंती केली. 

Updated: Oct 28, 2015, 10:08 PM IST
Bigg Boss 9: रिमी सेन जगासमोर रडल्यानंतर तिच्या आईने गुपीत उघड केलं title=

नवी दिल्ली :  बिग बॉसच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की कोणताही सदस्य बंद आहे आणि तो घरातून बाहेर येण्यासाठी विनवण्या करीत आहे. पण या सिझनमध्ये वेगळं घडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानशी बोलताना अभिनेत्री रिमी सेन भावूक झाली आणि ढसाढसा रडली. सलमानला तिने घराबाहेर जाण्याची विनंती केली. 

रिमी एलिमिनेशनपासून वाचल्यामुळे नाराज झाली आहे. रिमीने पहिल्या दिवशीच घर सोडण्याचे बोलले होते. 

विशेष म्हणजे रिमी जेव्हा शोमध्ये भाग घेण्यासाठी आली तेव्हा परिवारातील कोणीच उपस्थित नव्हतं. रिमीला कोणी भाऊ-बहिण नाही आणि तिच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. जेव्हा ऱिमी शोमध्ये रडायला लागली तेव्हा तिचे फॅन्स आणि तिला ओळखणारे बुचकळ्यात पडले. पण तिच्या आईला याबद्दल काहीच वाटलं नाही. 

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रिमीची आई संघमित्रा म्हणाली. मी रोज बिग बॉ़स पाहते, त्यामुळे मला तिची आठवण येत नाही. मी ऐकले आहे की लोक तिला खूप वोट करीत आहेत. 

सलमान रिमीला सांत्वन करण्यावर रिमीची आई म्हणाली ' सलमान खूप चांगला माणूस आहे. रिमी त्याला 'क्यो की' चित्रपटापासून ओळखते. मी खूप प्रॅक्टीकल व्यक्ती आहे. तिला रडताना मी भावूक झाली नाही. रिमी लहानपणापासून एक स्वतंत्र आणि आत्मविश्वासी मुलगी आहे. ती एक नॅशनल स्कॉलर आहे. 

आपल्या मुलीबद्ल आठवण येते का असे विचारले असता त्या म्हणाली, लग्न केल्यानंतर ती परदेशात गेली तर मला तिची आठवण येणार नाही का. येणार आठवण येणार... पण रिमीला लग्न करायचं नाही आहे. रिमीवर अवलंबून आहे तीला काय करायचं आहे. तिचे मित्र आहेत पण इतक्या जवळचं कोणी नाही की ती त्याच्याशी लग्न करेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.