Bigg Boss 9: प्रिन्स नरूलाने केला नोरा फतेहीला किस्स...

 प्रिन्स नरूला हा बिग बॉसच्या घरातील सर्वांशी फर्ल्ट करणारा सदस्य आहे. त्याने सुरूवातीला युविका चौधरीला पटविण्याचा प्रयत्न केला. आपले प्रेम असल्याचे त्याने घरात जाहीर केले होते. 

Updated: Dec 18, 2015, 07:18 PM IST
Bigg Boss 9: प्रिन्स नरूलाने केला नोरा फतेहीला किस्स... title=

मुंबई :  प्रिन्स नरूला हा बिग बॉसच्या घरातील सर्वांशी फर्ल्ट करणारा सदस्य आहे. त्याने सुरूवातीला युविका चौधरीला पटविण्याचा प्रयत्न केला. आपले प्रेम असल्याचे त्याने घरात जाहीर केले होते. 

पण युविका घरातून बाहेर पडल्यावर आता प्रिन्सने आपला मोर्चा नोरा फतेहीकडे वळविला आहे. नव्याने बिग बॉसच्या घरात आलेली नोरा फतेही याचे प्रिन्ससोबत बॉन्डिंग झाले आहे. 

त्याचं गुळपिठ जमलं आहे. बिग बॉसने पुलसाइटला डिनर डेट या दोघांना दिली. यावेळी दोघांनी काही खासगी क्षण शेअर केले. पण यात प्रिन्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत नोराच्या माथ्यावर एक किस दिला. आणि त्यानंतर तो इथेच थांबला नाही त्याने तिचा गालावर दोन किस दिले. 

आग दोन्ही कडे लागली आहे, असे यावरून दिसते आहे. 

पाहा व्हिडिओ