कॉमेडियन कपिल शर्मा बिग बॉस होस्ट करणार

देशाचे कॉमेडियन कपिल शर्मा रिएलिटी शो बिग बॉसमध्ये यावेळी होस्ट असणार आहे. 

Updated: Dec 26, 2014, 07:30 PM IST
कॉमेडियन कपिल शर्मा बिग बॉस होस्ट करणार title=

मुंबई : देशाचे कॉमेडियन कपिल शर्मा रिएलिटी शो बिग बॉसमध्ये यावेळी होस्ट असणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार रियलिटी शो बिग बॉस सिझन ८ च्या शेवटी आता सलमान खान नव्हे, तर कपिल शर्मा शो होस्ट करतांना दिसणार आहे.

२७ डिसेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या भागात कपिल शर्मा बिग बॉसचा बॉस होणार आहे.

या भागात दादी आणि गुत्थी देखिल असणार आहे, जे आधी कॉमेडी नाइट्स विद कपिलमध्ये दिसत होते.

सलमान खानचा २७ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्याला हा दिवस आपल्या परिवारासोबत साजरा करावयाचा आहे. 

आपण बिगबॉसमध्ये यापुढे दिसणार नसल्याचं सलमान खानने जाहीर केलं आहे.
 
कारण कबीर खान यांचा आगामी सिनेमा 'बजरंगी भाईजान'च्या शुटिंगमध्ये सलमान खान व्यस्त असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.