भारती सिंगने गुपचूप पद्धतीने केला साखरपुडा

कॉमेडी अॅक्टर भारती सिंगने गुपचूप पद्धतीने साखरपुडा केल्याच्या चर्चा आहेत. कॉमडेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली भारती सिंग सध्या कॉमेडीमध्ये एक महिला म्हणून चांगलीच प्रसिद्ध आहे. भारती सिंगने तिचा बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचिया सोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याला दोघांच्या कुटुंबियांतील काही लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. लवकरच हे विवाहबंधनात अडकणार आहेत. भारती आणि हर्ष हे मागील 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

Updated: Jan 18, 2017, 08:08 PM IST
भारती सिंगने गुपचूप पद्धतीने केला साखरपुडा title=

मुंबई : कॉमेडी अॅक्टर भारती सिंगने गुपचूप पद्धतीने साखरपुडा केल्याच्या चर्चा आहेत. कॉमडेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली भारती सिंग सध्या कॉमेडीमध्ये एक महिला म्हणून चांगलीच प्रसिद्ध आहे. भारती सिंगने तिचा बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचिया सोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याला दोघांच्या कुटुंबियांतील काही लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. लवकरच हे विवाहबंधनात अडकणार आहेत. भारती आणि हर्ष हे मागील 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

भारती हर्षपेक्षा तब्बल आठ वर्षांनी मोठी आहे. हर्ष हा कॉमेडी नाइट्स बचाओ या शोचा लेखक आहे. भारती आणि हर्ष यांच्या साखरपुड्याला तिच्या काही सहकाऱ्यांनीही हजेरी लावली. दोघांच्या कुटुंबियांकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.