२३ वर्षीय अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या

बंगाली अभिनेत्री दिशा गांगुली हिचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकातामधील राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला आहे. तिनं आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Updated: Apr 10, 2015, 03:16 PM IST
२३ वर्षीय अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या title=

कोलकाता: बंगाली अभिनेत्री दिशा गांगुली हिचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकातामधील राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला आहे. तिनं आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

बंगाली मालिकांमध्ये छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या दिशानं तिच्या 'पर्णश्री' या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या मित्रानं दरवाजा तोडून तिचा मृतदेह खाली उतरवला होता. 
 
या प्रकरणी सध्यातरी कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. तसंच कोणाविरोधातही तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. ‘कनकांजली’ या लोकप्रिय बंगाली मालिकेत तिनं काम केलं होतं.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.