मुंबई : मुंबई मायानगरी आहे असे म्हटले जाते. ही मायानगरी अनेकांचे भविष्य ठरवते. जेवढे कठीण येथे जागा बनवणे असते तेवढेच कठीण संधी मिळणे. यातच कामाच्या शोधात आलेल्या अभिनेत्यांच्या जीवनाबाबत सर्वांनाच माहीत आहे. सध्या बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या कलाकारांनीही त्यांच्या आयुष्यात अनेक छोटीमोठी कामे केलीत.
अक्षय कुमार - बॉलीवूडचा 'खिलाडी' अशी ओळख असलेला अक्षय कुमार सुरुवातीला शेफ होता. तो बँकॉकमधील हॉटेलमध्ये शेफचे काम करीत असे. त्यानंतर तेथे त्याने मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेतले आणि बॉलीवूडमध्ये 'खिलाडी' अशी ओळख मिळवली.
अमिताभ बच्चन - यांना तर बॉलीवूडचे बिग बी म्हटले जाते. बॉलीवूडमध्ये येण्याआधी अमिताभ यांनी कोलकातामध्ये शिपिंग कंपनीत काम केले होते. त्यांनी रेडिओमध्येही काम करण्याचे प्रयत्न केले. मात्र तेथील अपयशाने त्यांना बॉलीवूडमध्ये आणले.
अर्शद वारसी - अर्शद बॉलीवूडमध्ये येण्याच्या आधी कोरिओग्राफर आणि डान्सर होता. त्याआधी तो कॉस्मेटिक्स पदार्थांची विक्री करत असे.
जॅकलीन फर्नांडिज - मिस श्रीलंका जॅकलीन फर्नांडिज बॉलीवूडमध्ये पाय रोवण्याआधी टीव्ही रिपोर्ट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होती.
कल्कि कोएचलिन - कल्कि कोएचलिनने या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी वेटरचे काम केले. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला ही नोकरी करावी लागत होती. सै
सोहा अली खान - सैफ अली खानची बहिण सोहा अली खान चित्रपटांत येण्यापूर्वी सिटी बँकेत काम करत होते. दिल मांगे मोअर या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
सनी लिओन - सनी लिओनने अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यापूर्वी जर्मन बेकरीत काम केले.
नवाजुद्दीन सिद्दीकी - या नावाला सध्या कोणी ओळखत नसेल असं होणार नाही. मात्र बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी त्याने चांगलाच संघर्ष केलाय. सुरुवातीला तो एका पेट्रो केमिकल कंपनीत केमिस्टचे काम करत होता. त्यानंतर त्याला सरफरोश चित्रपटात काम मिळाले. सरफरोश चित्रपट करण्यापूर्वी नवाजुद्दीने दिल्लीत वॉचमेनचे कामही केलेय.
शाहरुख खान - बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी शाहरुख खान पार्टीमध्ये सहाय्यकचे काम करायचा.
इरफान खान - कोणाचेही पाठबळ नसताना इरफान खानने बॉलीडवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केलीये. या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तो ट्यूशन टीचरचे काम करत होता. त्यासाठी त्याला त्याकाळी महिन्याकाठी प्रत्येक मुलामागे २५ रुपये मिळत.