‘बँग बँग’ सिनेमा २५० कोटींच्या घरात

Updated: Oct 11, 2014, 07:42 PM IST
‘बँग बँग’ सिनेमा २५० कोटींच्या घरात title=

नवी दिल्लीः हृतिक-कतरिना या जोडीचा ‘बँग बँग’ हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा झालाय. पहिल्याच आठवड्यात या सिनेमानं जगभारत एकूण २५०.७५ कोटींचा गल्ला जमवलाय.

गेल्या गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच दिवसी ७.४२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर संपूर्ण आठवडाभर एकच धुमाकूळ घालत या सिनेमानं भारतात, १३५.४५ कोटींचा बिझनेस केलाय. तसंच, 'बँग बँग' या सिनेमानं परदेशात आतापर्यंत ५७.२५ कोटींची कमाई केलीय. 

हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातदेखील चांगला बिझनेस करेल, असा विश्वास दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यानं व्यक्त केलाय.

२४१ कोटींची कमाई करून शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’नं सिनेजगतात एक वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. तर, २५० कोटींचा गल्ला जमवून हृतिकच्या बँग बँगनं त्यालाही मात दिलीय. याआधी सिनेमाने १०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात फास्ट एन्ट्री करण्यात पाचवं स्थान हस्तगत केलं होतं.

ऋतिकचा ‘कृष ३’ या सिनेमानं २०० कोटी पर्यंतचा आकडा गाठला होता. तर, ‘धूम ३’, ‘जब तक है जान’, ‘एक था टायगर’ या सर्व कतरिनाच्या सिनेमांनी २०० कोटींचा गल्ला कमविला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.