कपिल शर्माला मागे टाकत रितेशची 'लय भारी' एंट्री

Updated: Oct 11, 2014, 01:51 PM IST
कपिल शर्माला मागे टाकत रितेशची 'लय भारी' एंट्री title=

मुंबईः छोट्या पडद्यावर 'कॉमेडी नाईट' शो करणारा कपिल शर्मा हा आता मोठा पडद्यावर झळकण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता धुसर झाली आहे. तो यशराज बॅनरखाली ‘बँक चोर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार होता. त्याची जागा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख घेणार आहे.

कपिलला यशराज बॅनरखाली काम करण्याची संधी मिळत होती. मात्र, कुठे माशी शिंकली, ते काही समजले नाही. मात्र, 'लय भारी' मराठीत जोरदार धमाका उडवून देणाऱ्या रितेश देशमुखला घेण्यात आले. रितेशने ‘बँक चोर’ या सिनेमाची शुटिंग सुद्धा सुरू झाली आहे. या सिनेमात तो एका सामान्य माणसाची भूमिका साकरणार आहे. ही भूमिका चोराची असण्याची शक्यता आहे.

 
मी कपिल शर्माचा खूप चाहाता आहे. त्याच्यासोबत काम करायला मला आवडले असते. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मी हा सिनेमा करण्यासाठी खूप आनंदी आहे, असे रितेशने सांगितले. भविष्यामध्ये जर कपिलसोबत काम करायची संधी मिळाली तर मला आनंदच होईल. ‘बँक चोर’ या सिनेमात रितेशसोबत रिया चक्रवर्ती, विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.