'बाजीराव मस्तानी'ने मारली 'बाजी'

रणवीर सिंगचा बाजीराव मस्तानी आणि शाहरुख खानचा दिलवाले हा सिनेमा एकाच दिवशी रिलीज झाला.

Updated: Dec 22, 2015, 06:46 PM IST
'बाजीराव मस्तानी'ने मारली 'बाजी' title=

मुंबई : रणवीर सिंगचा बाजीराव मस्तानी आणि शाहरुख खानचा दिलवाले हा सिनेमा एकाच दिवशी रिलीज झाल्याने या दोन्ही सिनेमांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. पण बाजीराव मस्तानी हा सिनेमा बहुतेक या स्पर्धेमध्ये सरस ठरतांना दिसत आहे. 

पहिल्या दिवशी दिलवालेनी २१ कोटींची कमाई केली, तर बाजीराव मस्तानीने १२.५० कोटींची कमाई केली. पण दुसऱ्या दिवशी दिलवालेने 20 कोटी आणि बाजीराव मस्तानीने १५ कोटींची कमाई केली. 

सोमवारी चौथ्या दिवशी मात्र बाजीराव मस्तानीने दिलवालेला मागे टाकलं. दिलवालेने ९.५० कोटींची कमाई केली तर बाजीराव मस्तानीने १०.५० कोटींची कमाई केली आहे.