दुसऱ्या दिवशी कोण ठरला सरस बाजीराव कि दिलवाले?

शुक्रवार १८ डिसेंबर रोजी बॉलीवूडमधील दोन तगडे चित्रपट प्रदर्शित झाले. संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी आणि शाहरुख-काजोलचा दिलवाले हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगलीच टक्कर देतायत. 

Updated: Dec 20, 2015, 09:11 AM IST
दुसऱ्या दिवशी कोण ठरला सरस बाजीराव कि दिलवाले? title=

नवी दिल्ली : शुक्रवार १८ डिसेंबर रोजी बॉलीवूडमधील दोन तगडे चित्रपट प्रदर्शित झाले. संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी आणि शाहरुख-काजोलचा दिलवाले हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगलीच टक्कर देतायत. 

या दोन्ही चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी शाहरुखच्या दिलवालेने सरशी साधली. पहिल्या दिवशी दिलवालेने २२ कोटी रुपये कमावले तर बाजीरावने १२.८० कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिलवालेचे वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी दिलवालेने २३ कोटी रुपये कमावले. 

दिलवाले कमाईत दुसऱ्या दिवशी केवळ एक कोटीची वाढ पाहायला मिळाली. मात्र दुसरीकडे बाजीराव मस्तानीने चांगला वेग पकडल्याचे पाहायला मिळतोय. त्याने दुसऱ्या दिवशी १५ कोटींचा गल्ला जमविला. यासोबत दोन्ही दिवस मिळून शाहरुखच्या दिलवालेने ४५ कोटी कमावले तर दीपिका-रणवीरच्या बाजीराव-मस्तानीने २७ कोटींची कमाई केली.