मुंबई : यंदाच्या वर्षातला सगळ्यात बोल्ड सिनेमा ठरलेला 'हेट स्टोरी ३' कमाईच्या बाबतीत वर्षातला दुसरा सर्वांत जास्त नफा कमावणारा सिनेमा ठरलाय.
एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, 'हेट स्टोरी ३' हा सिनेमा बनवण्यासाठी १३.२० करोड रुपयांचा खर्च आला होता. यामध्ये, सिनेमाच्या शुटींपासून प्रमोशनपर्यंत सगळ्या खर्चाला सामील केलं गेलाय. पण, याच सिनेमानं केवळ भारतात जवळपास ५३.५० करोड रुपयांचा बिझनेस केलाय. म्हणजेच, या सिनेमाला जवळपास ४०.३० करोडोंचा नफा झालाय.... म्हणजेच जवळपास ३०५ टक्के...
तर, यंदाच्या वर्षातला सर्वात जास्त नफा कमावणारा सिनेमा ठरलाय 'तनु वेडस् मनू'... या सिनेमाटा खर्च होता ३१ करोड रुपये... पण, या सिनेमानं तब्बल १५२ करोड रुपयांची शानदार कमाई केलीय.
'हेट स्टोरी ३' देशात २६९० स्क्रीनवर प्रदर्शित झाला. या सिनेमात शरमन जोशी, डेझी शाह, झरीन खान आणि करण सिंग ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.