आता चिनी बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली' बनवणार रेकॉर्ड

एस.एस.राजामौली दिग्दर्शित बाहुबली या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये तब्बल सहा हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट झळकणार आहे. याबाबतची माहिती बाहुबलीच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आलीये. 

Updated: Feb 14, 2016, 09:12 AM IST
आता चिनी बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली' बनवणार रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : एस.एस.राजामौली दिग्दर्शित बाहुबली या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये तब्बल सहा हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट झळकणार आहे. याबाबतची माहिती बाहुबलीच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आलीये. 

ही पहिलीच वेळ आहे की इतक्या मोठ्या संख्येने एखादा भारतीय चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होतोय. याआधी आमिर खानचा पीके हा चित्रपट चीनमध्ये पाच हजार स्क्रीन्सवर दाखवण्यात आला होता. या चित्रपटाने चीनमध्ये चांगली कमाई केली होती. 

याच महिन्यात चीनमध्ये बाहुबली प्रदर्शित कऱण्याचा विचार होता. मात्र योग्य तारीख न मिळाल्याने उशिर झाला. बाहुबलीला प्रचंड यश मिळाल्यानंतर चाहते बाहुबली २च्या प्रतीश्रेत आहेत. याबाबतचे चित्रीकरण सुरु आहे. या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरवातीला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.