ऐश्वर्यानं घासली भांडी

सरबजीत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऐश्वर्या राय सध्या पंजाबमध्ये आहे. 

Updated: Feb 13, 2016, 10:41 PM IST
ऐश्वर्यानं घासली भांडी title=

अमृतसर: सरबजीत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऐश्वर्या राय सध्या पंजाबमध्ये आहे. या शूटिंगमधून वेळ काढून ऐश्वर्यानं सुवर्ण मंदिराला भेट दिली. 

खास पंजाबी पेहरावामध्ये ऐश्वर्या सुवर्ण मंदिरामध्ये गेली होती. दर्शन घेतल्यानंतर ऐश्वर्या लंगरमध्येही गेली. तिथे तिनं भक्तांसाठी जेवण करायला मदत केली. इतकच नाही तर भांडी घासणे, फरशी पुसण्याचं कामही तिनं लंगरमध्ये केलं.

 

ऐश्वर्याचा सरबजीत हा सिनेमा 20 मे ला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ऐश्वर्यानं सरबजीत सिंग याची बहिण दलबीर कौरची भूमिका केली आहे. तर रणदीप हुडा सरबजीतची भूमिका करणार आहे.